भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे नेतृत्वात शनिवारी खामगावात भाजपची पदयात्रा 

 मोठ्या संख्येने उपस्थित रहा-आ.अँड फुंडकरांचे आवाहन

 खामगांव::- जनोपचार न्यूज नेटवर्क:- संपर्क से समर्थन ,घर घर चलो या भाजपच्या अभियान अंतर्गत शनिवार २ सप्टेंबर रोजी खामगाव शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे नेतृत्वात पदयात्रा काढण्यात येणार आहे.


         शनिवार २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शहरातील मुख्य बाजापेठेत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. भारत कटपिस ,अर्जुन जलमंदिर येथून या यात्रेला सुरवात होणार असून मोठी देवी जगदंबा, महावीर चौक, मोहन चौक , फरशी मार्गे शहीद भगतसिंग चौकात या पदयात्रेलचा समारोप होईल. भाजपचे संपर्क से समाधान घर घर चलो अभियान अंतर्गत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात देशाचा जो मोठा विकास केला, देशाची अर्थव्यवस्था बळकट केली, सर्व क्षेत्रात अभूतपर्व कामे केली, शेतकरी, गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक चांगल्या योजना आणून त्या यशस्वी राबविल्या.देशाला प्रगती पथावर नेले याची माहिती या पदयात्रे द्वारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ अँड आकाश फुंडकर शहरातील व्यापारी, नागरिकांना प्रत्यक्ष भेटून देतील. या पदयात्रेची नियोजन बैठक आज स्थानिक साई जिनिंग मध्ये पार पडली. या बैठकीला आ अँड आकाश फुंडकर,  जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ,  शेगांव तालुकाध्यक्ष विजय भालतिडक,खामगाव  खविस अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार, उपाध्यक्ष सौ गोदावरीताई ढोन, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, आदी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post