भाजपा महिला मोर्चा खामगाव शहर तर्फे रक्षाबंधनाचा उत्सव संपन्न
सण उत्सव तर सर्वच साजरे करतात मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला भाजपाच्या महिलांनी तळागाळात असलेल्या भाजीविक्रेत्यांपासून ऑटो चालकांपर्यंत भावांना रक्षाबंधन त्यांचाही आनंद द्विगुणित केला आहे.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांच्या निर्देशानुसार तसेच आमदार आकश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव शहर येथे छोटे व्यावसायिक बंधु,ऑटो चालक,भाजीपाला, फळ विक्रेते, चहा विक्रेते,फेरीवाले, व विविध छोटे व्यावसायिक बंधु यांना महिला मोर्चाच्या भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला.
या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.
अनिता देशपांडे, माजी नगर सेविका सौ. शिवानी शेखर कु लकर्णी, सौ. भाग्यश्री विक्रम मानकर, कार्यकारिणीसदस्य सौ. शिवानी सचिन कुलकर्णी तसेच महिला मोर्चासदस्य तसेच बेटी बचाव अभियानाचे जिल्हा समिती सदस्य श्री अभय जी मुंडे, श्री. ओम जी खंडेलवाल तसेचकर्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment