महाराष्ट्र राज्य तहसीलदार,नायाब तहसीलदार जिल्हाध्यक्षपदी हेमंत पाटील यांची निवड
खामगाव: (जनोपचार )महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच २४ ऑगस्ट रोजी गठीत करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून खामगाव येथील नायब तहसीलदार हेमंत पाटील यांची सर्वानुमती निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून माया माने, एच डी वीर, सचिव संजय बंनगाळे, सहसचिव संतोष मुंडे, कोषाध्यक्ष समाधान सोनवणे, सह कोषाध्यक्ष अनंता पाटील, संघटक निलेश मडके, गिरीश जोशी, महिला प्रतिनिधी शितल सोलाट, आसमा मुजावर, सल्लागार दिनेश गीते,रामेश्वर पुरी,
शैलेश काळे, राजेंद्र जाधव, राजेंद्र पोळ, शरद पाटील, आर एन देवकर कार्यकारणी सदस्य सचिन जयस्वाल, डी एल मुकुंदे, योगेश टोपे, सुनील आहेर या सर्वांचा बुलढाणा जिल्हा कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी बुलढाणा जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यासाठी आर एन देवकर यांनी मागील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारणी गठीत करण्यासाठी ठराव मांडला यावर सविस्तर चर्चा होऊन जिल्हा कार्यकारणी लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. तर विभागीय स्तरीय प्रतिनिधीसाठी खामगाव येथील नायब तहसीलदार विजय पाटील सर्वानुमती निवड करण्यात आली. व विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी,प्रभारी अपर जिल्हाधिकारी दिनेश गीते,आणि उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद शैलेश काळे निरीक्षक म्हणून होते.व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
Post a Comment