धनंजय लाड शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातून दुसरा


खामगाव- लायन्स ज्ञानपीठ खामगाव या शाळेचा विद्यार्थि धनंजय हरिदास लाड याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातून दुसरा तर शहरी विभागातून पंधरावा क्रमांक मिळाल्याबद्दल राज्याचे अन्न वआपत्ती पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कुटुंबीयासमवेत सत्कार करण्यातआला.


याप्रसंगी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, अमरावती पदवीधर विभागाचे आमदार धीरजलिंगाडे, तुम्मोडजिल्हाधिकारी बुलढाणा, भाग्यश्रीविसपुते मुख्य कार्यकारी अधिकारीबुलढाणा, सुनील कडासणे पोलीसअधिक्षक बुलढाणा हे मान्यवरउपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post