जेसीआय खामगाव जय अंबे च्या वतीने श्रावण उत्सवाचे आयोजन
खामगाव शहरातील सर्व परिचित जेसीआय खामगाव जय अंबे या संस्थेतर्फे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रविवारी पंचशील होमिओपॅथिक कॉलेज सिविल लाइन रोड खामगाव येथे श्रावण उत्सवाचे आयोजन सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे
जेसीआय खामगाव जय अंबे संस्थेचा मागिल वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या श्रावण उत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आपल्या श्रावण मासा मधील रूढी परंपरा सण जे काळाच्या ओघात आपण विसरत चाललोय त्यांचा परिचय आपल्या येणाऱ्या नवतरुण पिढीला करून द्यावा आपल्या सांस्कृतिक धरोहराचे जतन व्हावे व आपल्या संपूर्ण परिवारासोबत श्रावण मासातील उत्सवांचा आनंद सर्वांना घेता यावा असा आहे यासोबतच विविध प्रकारची वस्तूंची खरेदी तसेच अनेक नवनवीन व्यंजनांचा आस्वाद आपण घ्यावा याकरिता श्रावण उत्सवात अनेक घरगुती व्यावसायिक जे तेवढे नावाजलेले नाहीयेत त्यांचा परिचय नवीन ग्राहकांशी व्हावा सर्व व्यावसायिक स्टॉल धारकांना त्यांचा व्यवसाय वाढीचा एक नवीन मार्ग मिळावा त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवून नवीन ओळखी वाढवाव्या याकरिता एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करावा असाही उद्देश यामागे संस्थेचा आहे
या श्रावण उत्सवात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी दिवसभर विविध प्रकारच्या प्रतियोगिता आयोजित केलेल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने
मटकी डेकोरेशन
तिरंगा डिश कॉम्पिटिशन
मंगळागौर कॉम्पिटिशन
कलरिंग कॉम्पिटिशन
फॅशन शो आई आणि मुलांसाठी
म्युझिकल चेअरराईम कॉम्पिटिशन
रॅपिड अंताक्षरी
अशा प्रतियोगिता तसेच लहान मुलांसाठी प्ले झोन गेम झोन असून या व्यतिरिक्त दिवसभर वेगवेगळे गेम्स सुद्धा खेळवले जाणार आहेत या सर्व प्रतियोगितांमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकांना संस्थेतर्फे विविध प्रकारची बक्षीसही दिल्या जाणार आहे या श्रावण उत्सवाच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल लकी ड्रॉ दिवसाच्या शेवटी काढण्यात येईल आणि त्याच्या विजेत्यालाही पारितोषक मिळेल
खामगाव शहरातील सर्व नागरिकांनी या श्रावण उत्सवाचा लाभ घ्यावा श्रावण उत्सवात तसेच प्रतियोगिता मध्ये भाग घेण्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजना बाबत जेसीआय खामगाव जय अंबे चे मार्गदर्शक जेसी डॉ भगतसिंग राजपूत
जेसी शालिनी राजपूत
पूर्वाध्यक्ष जेसी एडवोकेट रितेश निगम
प्रकल्प प्रमुख जेसी सोनाली टिंबाडिया
प्रकल्प सहप्रमुख जेसी हेतल वाधवाणी
प्रकल्प सहप्रमुख जेसी पुनम घवाळकर
अध्यक्ष जेसी कौस्तुभ मोहता 9422926530
सचिव जेसी योगेश खत्री 9890725000
कोषाध्यक्ष डॉ गौरव गोयनका 9922146664
या सर्वांना आपण संपर्क करू शकता अशी माहिती जेसी रोहन जैसवाल यांनी दिली
Post a Comment