रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

 संत निरंकारी ब्रँच खामगांव तर्फे रविवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  संत निरंकारी मंडळ दिल्ली- ब्रँच खामगांव तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी  - संत निरंकारी सत्संग भवन, घाट पुरी बायपास, खामगांव येथे सकाळी ९ ते २ या वेळेत करण्यात आले आहे. 


                सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण भारतात संत निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. 

खामगांव ब्रँच मुखी अजयजी छतवाणी तथा त्यांच्या सोबतच सर्व महात्मा तथा बहेनजी या रक्तदान शिबिरासाठी जनजागृती करत आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान- वाचवी रुग्णाचे प्राण हा नारा देत असुन या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या मानव सेवेच्या कार्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन संत निरंकारी मंडळ, खामगांव ह्यांच्या वतीने केले आहे.

जाहिरात



Post a Comment

Previous Post Next Post