४५० बहिणी एकाचवेळी बनल्या ब्रह्माकुमारी
खामगाव :-ब्रह्माकुमारीजच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळेस ४५० एवढ्या बहिणींचा समर्पण सोहळा पार पडला. देशभरातून या बहिणी आपल्या आईवडील व नातेवाईक यांच्यासोबत ब्रह्माकुमारीचे मुख्यालय असर्लेल्या शांतिवन, आबुरोड, राजस्थान या ठिकाणी पोहचल्या होत्या. पंधरा हजार लोकांच्या साक्षीने हा भव्य दिव्य अलौकिक सोहळा संपन्न झाला.
पीएचडी (झ्प्D), इंजीनियरिंग, एम टेक, एम एस सी, A्न्दम्aूा, सी ए, झालेल्या ४५० बहिणींनी आपल्या संयमी जीवनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना शिवप्रिया बनवून ब्रह्मकुमारीच्या रूपाने त्या समाजसेवा करणार आहेत. ब्रह्माकुमारी संस्थेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की एका वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने या बहिणींचा अलौकिक समर्पण सोहळा ३० जून २०२३ ला शांतिवन येथे संपन्न झाला आणि या सोहळ्याचे १५ हजार लोक साक्षीदार बनले आहेत. समर्पित होणार्या या सर्व बहिणी आपल्या आईवडील व परिवारासोबत शांतिवनला पोहोचल्या होत्या.
तीन दिवसीय या अलौकिक समर्पण सोहळ्याचा शुभारंभ २८ जून बुधवार रोजी संपन्न झाला असून पहिल्या दिवशी ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी बी के मुन्नी दीदी यांनी एका बहिणींची आणि त्यांच्या आईवडील व परिवाराची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की ते आईवडील खूप भाग्यशाली आहेत की ज्यांच्या घरी अशा देवी स्वरूप कन्यांनी जन्म घेतला आहे. ज्या स्वतःसोबत आपल्या परिवाराचे व आपल्या समाजाचे नाव रोशन करण्यासाठी निघाल्या आहेत. स्वतःसाठी तर सर्वजण जीवन जगत आहेत परंतु आता यापुढे या बहिणी ब्रह्माकुमारी बनुन समाजसेवा व समाज कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करीत आहेत.
यावेळी सर्व ४५० बहिणींच्या आई-वडिलांनी आपल्या लाडक्या कन्येचा हात संस्थेच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी रतनमोहिनीजी यांच्या हातात सोपविला आणि त्यासोबत समर्पणाची ही प्रक्रिया पूर्ण झाली. या सर्व बहिणींनी नवरी प्रमाणे शृंगार करून परमपिता शिव परमात्माला जीवनसाथीच्या रूपात स्वीकार करून विश्वसेवेमध्ये आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला.
५ वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतरच या बहिणी समर्पित होऊ शकतात. ब्रह्माकुमारी बनण्याआधी सुरुवातीला पाच वर्षापर्यंत या बहिणींना सेवा केंद्रावर राहावे लागते यादरम्यान त्यांचे आचरण, समज, विचार, व्यवहार आणि अध्यात्म प्रति ओढ बघितली जाते. त्यानंतर ज्या बहिणी ब्रह्माकुमारी संस्थेचे नियम व मर्यादेनुसार चालून पूर्णपणे त्याग, तपस्येच्या मार्गानुसार चालतात त्यांनाच पुढे समर्पित केले जाते व त्यानंतर ही अलौकिक समर्पणाची प्रक्रिया पूर्ण होते. ब्रह्मकुमारीच्या दिनचर्यामध्ये सकाळी अमृतवेलेला साडेतीन वाजता उठून राजयोग ध्याना सोबत सेवा व नियमित सत्संग करणे अनिवार्य असते.
ब्रह्माकुमारीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा समर्पण सोहळा संपन्न झाला आहे. शांतिवन सह संपूर्ण विश्वामध्ये सर्वात मोठा अलौकिक समर्पण सोहळा असून याआधी २०१३ मध्ये ४०० बहिणींनी संयमाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार करून समर्पण करण्याचा संकल्प केला होता.
Post a Comment