जिल्हा विकास आरखडा बाबत नागरिकांना जाहिर आवाहन
बुलढाणा, :- बुलडाणा जिल्हयातील सर्व नागरिकांना, संस्था व आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत India@2047 करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्ट जाहीर केले आहे. सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट सुध्दा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकाससित होणे गरचेचे आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.7 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल व असा विकास सर्वसमावेश असेल आणि शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याकरिता पुढील बाबींबाबत आपले अभिप्रायाची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या बाबीबाबत अभिप्राय घेतला जाईल. जिल्हयाच्या विकासासाठी कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माण सह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इ. क्षेत्रांची वृध्दीबाबत अभिप्राय. शाश्वत विकास ध्येय 2023 उद्दिष्ट साध्य करणे. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजना व आपले अभिप्राय dpobuldanadpc@gmail.com या मेल आयडीवर किंवा लेखी स्वरुपात दि. 12 जुलै 2023 पर्यंत जिल्हा नियेजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा-443001 या पत्यावर कळवावे असे जिल्हा नियोजन अधिकारी सु.च. लाड जिल्हा नियोजन समिती, बुलडाणा यांनी कळविले आहे.
000000000
Post a Comment