रोटरी क्लब खामगांवद्वारे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संपन्न


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: रोटरी क्लब खामगांव हा एक सामाजिक कार्य करणा-या व्यक्तींचा समूह असून यामध्ये नि:स्वार्थ भावनेने कार्य करणा-या व्यक्तींचा भरणा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कुणालाही कुठल्याही पुरस्काराची आवश्यकता भासत नाही परंतु एखाद्या व्यक्तीचे कौतुक आपण निदान शब्दसुमनांनी केले तर त्याचा उत्साह वाढीस लागतो आणि त्याला भविष्यात अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब खामगांवद्वारे दर वर्षी एक कौतुकसोहळा आयोजित करण्यात येतो ज्यामध्ये वर्षभर वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.  यावर्षी हा रोटरी कौटुंबिक सोहळा एमआयडीसी स्थित रो अमनदीप जुनेजा यांच्या श्री भारत ऍग्रो इंडस्ट्रीज येथे रविवार दिनांक २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. मंचावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ आनंद झुंझुनूवाला हे प्रमुख अतिथी म्हणून तर असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो अनिरुद्ध पालडीवाल (शेगांव) हे निमंत्रित पाहुणे म्हणून रोटरी क्लब अध्यक्ष आलोक सकळकळे यांचे अध्यक्षतेखाली व रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया यांच्या उपस्थितीत हजर होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर उपस्थित सर्वांच्या मार्गदर्शनपर संबोधनानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरु झाला ज्यामध्ये वर्ष २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या रोटरी सदस्यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सुमारे २८ प्रकल्प प्रमुख व्यक्तींना यावेळेस सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मनोरंजनाचा भाग  म्हणून रो सुनील नवघरे आणि रो राजीव नाथानी व रो श्रुती नाथानी यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी श्रोत्यांची वाहवा मिळविली. उत्कृष्ट असे संचालन रो विशाल गांधी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ अनुराधा गांधी यांनी केले तर सहाय्यकाची भूमिका रो सौरभ चांडक व रो विनीत लोडाया यांनी निभाविली. आभार प्रदर्शन क्लब सचिव रो रितेश केडिया यांनी केले. जागेअभावी सर्वांची नांवे येथे देता येणे शक्य नाही परंतु ठळकपणे "उदयोन्मुख रोटेरिअन ऑफ द ईअर" हा पुरस्कार रो मुकुंद मोटवानी यांना तर "उत्कृष्ट रोटेरिअन ऑफ द ईअर" हा पुरस्कार रो आशिष पटेल यांना जाहीर झाला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी हा पुरस्कार मंचावर आसिन पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक स्विकारला. तसेच "वर्षभर उत्कृष्ट हजेरी पुरस्कार" रो रितेश अग्रवाल यांना तर "नाविन्यपूर्ण प्रकल्प" हा पुरस्कार हॅपी  स्ट्रीट साठी रो अमन जुनेजा यांना देण्यात आला. तसेच "उत्कृष्ट जनसंपर्क मोहीम" हा पुरस्कार तिरंगा रॅलीसाठी रो संकेत धानुका यांना, "उत्कृष्ट सर्विस प्रकल्प" हा पुरस्कार त्वचाविकार रोगनिदान शिबिरासाठी रो विनय मोहनानी यांना प्रदान करण्यात आला. सर्वांचे आभार मानून आषाढ ग्रुपद्वारे आयोजित भोजनानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post