इमानदार पोलीस

सापडलेले पैसे पोलीस मिरगे यांनी केले परत


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- पैसे घेणारे पोलीस ऐकिवात आहेत मात्र सापडलेले पैसे ज्याचे आहेत त्याच्याकडे सुखरूप परत केल्याने पोलिसांची मान पुन्हा उंचावली आहे. एएसआय विजय मिरगे यांनी ही इमानदारी दाखविली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार सुधाकर देवराव आंबुसकर राहणार वाडी यांनी जलंब नाका खामगाव स्थित अर्बन बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले ते पैसे त्यांचे खिशातून खाली पडले . दरम्यान खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत ए एस आय विजय मिरगे ड्युटीवर येत असताना त्यांना ते दिसून आले सायंकाळी अंबुसकर पोलीस स्टेशनला चौकशी करत आल्यावर शहानिशा करून त्यांना त्यांचे सहा हजार रुपये परत करण्यात आले आहेत. एकंदरीत हरवलेले पैसे परत मिळाल्याने सलून व्यावसायिक आंबुसकर यांनी मिरगे तसेच पोलीस विभागाचे धन्यवाद मानले.


Post a Comment

Previous Post Next Post