सिल्वरसिटी मध्ये “खामगाव लैपकॉन” थाटात संपन्न
रविवार दि.२८/०५/२०२३ रोजी सिल्वरसिटी हॉस्पिटल येथे विदर्भ सर्जन्स असोशिएशन , असोशिएशन ऑफ सर्जन्स अमरावती व बुलढाणा सर्जिकल सोसायटी यांच्या सयुंक्त विद्यमाने व परिश्रमाने खामगाव नगरीत प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात लॅप्रोस्कॉपिक (वर्कशॉप)कार्यशाळा व ती देखील ऑपेरेशन थिएटर मधून थेट प्रक्षेपणद्वारे हॉल मध्ये उपस्थित विदर्भभरातील सर्जन लोकांना दाखविण्यात आले .
यात बरेचसे ऑपेरेशन हे मोठे व गुंतागुंतीचे स्वरूपाचे होते . साधारणत: अशा ऑपेरेशनला मोठ्या शहरामध्ये लाख ते दीडलाख खर्च अपेक्षित असतो . ते या कार्यशाळेत पूर्णत: नि:शुल्क करण्यात आले . असे एकंदरीत लागोपाठ दहा ऑपेरेशन पूर्ण करण्यात आले . यासाठी विदर्भातील नामवंत लॅप्रोस्कॉपिक सर्जन्स तेथे उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने डॉ. गिरीश जतकर अध्यक्ष, विदर्भ सर्जन्स असोशिएशन व डीन, शासकीय वैदकीय महाविद्यालय, यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. इतर तज्ञ डॉक्टरांमध्ये डॉ. प्रशांत रहाटे , नागपूर , डॉ. मुकुंद ठाकूर , नागपूर, डॉ. सुनील मापारी, अकोला , डॉ. विकास जैन,गोंदीया, डॉ. निर्मल पटले , नागपूर , डॉ. शिरीष चौधरी, चंद्रपूर , डॉ. अभिषेक भागवत , अकोला हे उपस्थित होते . या व्यतिरिक्त विदर्भभरातील व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ , अनुभवी व तज्ञ सर्जन लोकांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेच्या उद्घघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाण्याचे सिव्हील सर्जन डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते. या उद्घघाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव येथील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत खूप समाधान व्यक्त केले व आणखी अशा कार्यशाळा घेण्याबाबत सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यांच्या समवेत उद्घघाटनाच्या कार्यक्रमात डॉ. सौ.सीमा सुने अध्यक्ष, असोशिएशन ऑफ सर्जन्स , अमरावती डॉ. गजानन व्यवहारे अध्यक्ष, बुलढाणा सर्जीकल सोसायटी व सिल्वरसिटी हॉस्पिटल तर्फे डॉ. प्रशांत कावडकर व डॉ. पंकज मंत्री हे उपस्थित होते. या प्रसंगी या कार्यशाळेचे आयोजन अध्यक्ष डॉ. निलेश टीबडेवाल व आयोजन सचिव डॉ. गौरव गोयनका हे देखील उपस्थित होते .
या उद्घघाटनातील स्वागतीय भाषणात डॉ. निलेश टीबडेवाल यांनी सगळ्या मान्यवरांचे स्वागत करून कार्याशाळेबद्दल इतन्भूत माहिती दिली व या उद्घघाटन कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. गौरव गोयनका यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रुती लढ्ढा व डॉ. समृद्धी मेंढे यांनी केले.
या सगळ्या ऑपेरेशनस मध्ये भुलतज्ञ म्हणून डॉ. मनीष अग्रवाल , डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. राजाभाऊ क्षीरसागर यांनी काम पहिले .
असा हा अभिनव उपक्रम विदर्भामध्ये तालुकास्तरावर पहिल्यांदाच करण्याचा मान सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव यांनी पटकावला व त्याची स्तुती विदर्भस्तरावर होत आहे. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मागील दोन महिन्यापासून डॉ. निलेश टीबडेवाल, डॉ. गौरव गोयनका , डॉ. समृद्धी मेंढे हे डॉ. अनिल शंकरवार , डॉ. अभय चांदे , डॉ. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र दिवस झटत होते तसेच समस्त संचालक मंडळ व स्टाफ सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव, यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
ज्या सर्व रुग्णांनी हे अत्याधुनिक लॅप्रोस्कॉपिक ऑपेरेशन या कार्यशाळेमध्ये करण्यास होकार दिला त्या सर्व रुग्णांचे सिल्वरसिटी हॉस्पिटल तर्फे आभार व्यक्त करण्यात आले .
Post a Comment