लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकरांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांनी घेतला लाभ
खामगाव ::- लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकरांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि.31 मे 2023 रोजी खामगांव शेगांव रोड वरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे भव्य शिबीर सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा हजारो गरजूंनी लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते झाले. लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर या शिबिराची सुरवात झाली. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ निलेश टापरे , वैद्यकीय अधिकारी व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात नेत्र, हृदय रोग , हर्निया, हायड्रोसील, विविध प्रकारच्या गाठी असलेल्या रुग्णांची तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच रुग्णांना मोफत औषधी सुद्धा वितरण करण्यात आली. तपासणी मध्ये नेत्र , हर्निया, गाठी व इतर शस्त्रक्रिया साठी शेकडो रुग्ण आढळून आले. अश्या रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालय व काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये रक्त, मधुमेह , इतर आवश्यक सर्व तपासणी करून एका आठवड्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी सामान्य रुग्णालयाचे डॉ. निलेश टापरे वैद्यकीय अधिक्षक, डॉ गोयनका शल्य़ चिकीत्सक़, डॉ लढढा नेत्र चिकीत्सक़ , डॉ यु.राजपूत नेत्र चिकीत्सक अधिकारी, डॉ मेंढे शल्य़ चिकीत्स़क ,डॉ चव्हाण वैद्यकीय अधिकारी औषधे, ए.के.लाघे वैद्यकीय अधिकारी (नेत्र), ए.जी.पवार नेतत्रचिकीत्सक अधिकारी, डॉ.पवार,डॉ अढाव, डॉ दगडे, डॉ वसूकर, डॉ अढाव मॅडम, डॉ जावेद खान, डॉ सिमा इंगळे, तसेच परिचारिका संध्या मिसाळ, किरन बुरुकले, ठक यांनी सेवा दिली. दुपारी 4 वाजेपर्यंत रुग्ण तपासणी सुरू होती. शेकडो गोर गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार असून त्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. याबाबत त्यांनी सागरदादा फुंडकर व आ अँड आकाश फुंडकर यांचे आभार मानले आहे.
Post a Comment