जनोपचार द रियल न्यूज

 खामगाव महात्मा ज्योतिराव फुले नागरी सहकारी पतसंस्था खामगाव च्या पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अध्यक्ष गजानन राऊत , उपाध्यक्ष विजय वावगे  तर सचिव एकनाथ इंगळे यांची निवड



खामगाव महात्मा ज्योतिराव फुले नागरी सहकारी पतसंस्था खामगाव च्या पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे अध्यक्ष म्हणून गजानन राऊत उपाध्यक्ष विजय भाऊ आणि सचिव म्हणून एकनाथ इंगळे यांचे निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निंबधक विभागाचे अधिकारी ये एच भांबेरे यांनी काम पाहिले आहे .

महात्मा फुले पतसंस्था ही माळी समाजाच्या माध्यमातून तयार केलेली एक संस्था आहे.


 या संस्थेमध्ये समाजातील तथा अन्य सभासद वर्गाला लघुउद्योग , वाहन तारण तसेच  वैयक्तिक कर्ज वितरित करण्यात येते.

 30 वर्षापासून स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये पाचशेच्या वर सभासद आहेत.

 या संस्थेचे विस्तारीकरण करण्याकरिता नवीन संचालक मंडळाने संकल्प केलेला आहे.


 महात्मा फुले पतसंस्थेमधून अनेक महिला बचत गटांना त्यांचा उद्योग वाढीसाठी कर्ज स्वरूपात मदत देण्यात येते.

 पन्नास बचत गट संस्थेसोबत जोडले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळातील निवडणूक बिनविरोध झाली असून यामध्ये गजानन किसनराव राऊत यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून विजय वावगे सचिव म्हणून एकनाथ इंगळे यांची निवड करण्यात आली. संचालक म्हणून सुभाष निखाडे ऍड सौ प्रतिमा निखाडे , सुरेश सदाफळे  , प्रवीण माळी , सुनंदा खराते ,सौ रंजना गजानन राऊत बिनविरोध निवडून आले आहेत .स्वीकृत संचालक म्हणून नवनिर्वाचित संचालक मंडळाने  खामगाव अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी महादेवराव खंडारे आणि आय टी आय पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष उल्हास वानखडे यांची निवड केली आहे.



संस्थेच्या प्रगतीसाठी आणि समाजातील दुर्लक्षित आणि गरजू लोकांना पुढे येण्यासाठी तसेच लघुउद्योगांना सहकार्य करण्यासाठी संस्था अविरत काम करत राहील अशी ग्वाही  नवनिर्वाचित संचालक मंडळाने दिली आहे.


 संस्थेमध्ये सध्या फिक्स डिपॉझिट चे दर 9% असून ज्येष्ठ नागरिकांना साडेनऊ टक्के व्याजदर मिळणार आहे. मंगळवारी झालेल्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व नवनिर्वाचित संचालकांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्व दूर प्रसारित व्हावे यासाठी संस्था प्रयत्न करेल असे संचालक मंडळांनी यावेळी सांगितले. संस्थे करिता नव्याने  संग्राहक नेमून रोज छोटया छोट्या व्यवसायाकडून कलेक्शन करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post