अनोखा उपक्रम: महामानवास सकाळी 7 वाजता अभिवादन
खामगाव : शहर व तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून सकाळी 7 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. ज्या महापुरुषाने रंजल्या गंजल्या, उपेक्षित, पिडीत जनतेच्या जीवनात प्रकाश टाकला, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महापुरुषांस सकाळी 7 वाजता अभिवादन केले जाते. सकाळी सकाळी अभिवादन करण्याची ही परंपरा कायम राखता याही वर्षी विविध पक्ष, विविध संघटना मधील आंबेडकरी समूह एकवटला. त्यामध्ये गौतम गवई सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती ), अजय तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ( ओबिसी ) जेष्ठ आंबेडकरी नेते अंबादास वानखडे, रमेश सिरसाट माजी सभापती, कैलास सिरसाट बहुजन टायगर संघटना, पी आर उपर्वट माजी प्राचार्य, किरण मोरे संपादक प्रखर प्रहार, रमेश डोंगरे सर, मुळे रिटायर्ड ठाणेदार, विजय बोदडे रिपाई तालुकाध्यक्ष,धम्मप्रचारक धम्मपाल गवई, युवा काँग्रेस नेते अतुल सिरसाट, प्रकाश इंगळे उपसरपंच, गजानन आठवले उपसरपंच, राजू खंडारे, मनोज बोदडे तालुकाध्यक्ष खामगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती, जेष्ठ काँग्रेस नेते प्रल्हाद काका सातव,महेंद्र वानखडे, साहेबराव हिवराळे, काशीराम वाघमारे,पद्माकर दामोदर, सहदेव इंगळे,बाळू गवई, शुभम सिरसाट, अनिल गुडदे इत्यादी उपस्थित होते. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार व हक्क यावर गौतम गवई सह अंबादास वानखडे, पी आर उपर्वट, प्रल्हाद सातव, अतुल सिरसाट, कैलास सिरसाट व गबाजी मुळे इत्यादीनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
Post a Comment