नवजात कन्यांनाही दिले वस्त्र
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- जागतिक महिला दिनानिमित्त आज स्थानिक जिजाऊ सावित्रीबाई फुले उत्सव महिला मंडळाच्या वतीने आज सरकारी हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न प्राप्त झालेल्या महिलांचा साडी चोळी तसेच बाळाला कपडे देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉक्टर आदित्य शिरसाट स्त्रीरोगतज्ञ , डॉक्टर अंतिमा गवई डेंटिस्ट, राठोड सिस्टर ,आर लाड सिस्टर ,व्ही तायडे सिस्टर यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यश्री हिवराडे ,संध्या पद्मने, रेखा नींबूकार ,बाळापुरे मॅडम, कमलबाई चांदुरकर, छायाबाई खंडेराव गायकवाड ,अरुणा भारसाकडे ,मालती पोटरे ताई, गवांदे ताई ,करुणाताई शीलाताई या सर्वांनी कार्यक्रमाचे परिश्रम घेतले.
Post a Comment