आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मधे जागतिक महिला दिन उत्त्साहात साजरा
खामगाव :- स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये बुधवार दिनांक 08-03-23 ला जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सदस्या सौ प्रियंका राजपूत ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कविश्वरसिंह राजपूत हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच राजमाता माँ जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि शाळेच्या संस्थापिका सौ विजयाबाई राजपूत यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली. आनंददायी वातावरणात उपस्थित मान्यवरांचे आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ पळसकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ पातूरकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे, शिक्षिकेंचे, मदतनीसचे तसेच सर्व महिलांच्या कार्याला नमन करत जीवनात आनंद आणि प्रेम या सर्व महिलांमुळेच आहे असे प्रतिपादन केले. शिक्षिकेंनी त्यांच्या भाषणातून सर्व थोर महिलांचे गुणगान केले आणि त्यांच्या आदर्श जीवनाचे जर सर्वांनी अवलोकन केले तर आदर्श व्यक्तिमत्व घडून एक उन्नत राष्ट्र घडेल असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ वैराळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शाळेच्या प्राचार्य सौ. अनिता पळसकर , ज्येष्ठ शिक्षिका सौ. ममता महाजन , कु माधुरी उगले,सौ अश्विनी देशमुख, सौ ज्योती वैराळे,सौ कल्पना कस्तुरे, सौ वैशाली पातुरकर, कु दामिनी चोपडे, सौ अलका वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ गायत्री पोकळे, सौ विजया पोकळे, सौ सारिका सरदेशमुख, कु प्रतीक्षा साबळे तसेच श्रीमती सपना हजारे, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ राजकन्या वडोदे, सौ प्रतिभा गावंडे या सर्व शिक्षिकेंनी मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
Post a Comment