*प्रभु श्रीरामचंद्राच्या आरतीमध्ये मातंग समाज बांधवांचा सहभाग*
*खामगांव दिनांक २२ मार्च २०२३ रोजी आयोजित विश्व हिंदू परिषद, बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती खामगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्ष प्रतिपदा (गुढीपाडवा) ते श्रीराम नवमी दिनांक २२/०३/२०२३ बुधवार ते दिनांक ३०/०३/२०२३ गुरुवार पर्यंत श्रीराम जन्मोत्सव आयोजित केला आहे या दरम्यान दररोज सकाळ व संध्याकाळ विविध समाज बांधवांच्या शुभहस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच आज दिनांक २२/०३/२०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता मातंग समाज, चर्मकार समाज, व भावसार समाज, यांच्या वतीने प्रभु श्रीराम मूर्तीची आरती करण्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मातंग समाज बांधवांच्या वतीने सर्व प्रथम प्रभुश्रीराम मूर्तीची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि बोलो सियावर प्रभु श्रीरामचंद्र की जय !! जय श्रीराम जय श्रीराम !! च्या जय घोषात अरतीला सुरुवात करण्यात आली व आरती झाल्यानंतर मान्यवरांनी श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रा बद्दल मार्गदर्शन केले व शा.ना.मानकर सर यांनी प्रभु श्रीराम यांच्या बद्दल माहिती दिली आणि कृष्णा नाटेकर यांनी श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत मातंग समाजातील युवक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी ग्वाही देऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती यांनी मातंग समाज बांधवांना आरतीमध्ये प्राधान्य दिल्याबद्दल यांचे आभार मानले यावेळी सेवानिवृत्त बँक मॅनेजर माधवराव कांबळे सेवानिवृत्त शिक्षक शा.ना.मानकर सौ.शिलाताई मानकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ नाटेकर गजानन बँडचे संचालक मास्टर श्रीराम गायकवाड सुनिल वानखडे जाणुजी मानकर ओम नाटेकर आदीसह समाजचे रामभक्त बहुसंख्येने उपस्थित होते
Post a Comment