रासेयो शिबिरार्थ्यांनी केली स्मशानभूमीची साफसफाई 


कुऱ्हा :- मंगरूळ दस्तगीर येथील श्री संत लहानुजी महाराज मंदिरात श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरा दरम्यान सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झालेत. यादरम्यान श्रमदान अंतर्गत शिबिरार्थयानी येथील  स्मशानभूमीची साफसफाई केली. स्मशानभूमी परिसरातील विविध झाडे झुडपे कापलीत.अस्ताव्यस्त असलेला कचरा गोळा केला आणि योग्य अशी विल्हेवाट लावली.स्मशानभूमीत जाण्यात लोक विशेषतः महिला जाण्यास धजावत नाही.अशा परिस्थितीत स्मशानभूमी साफसफाई करिता विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनी/ स्वयंसेविका यांनी धाडस करीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व गावकऱ्यांसमोर नवा पायंडा घालून दिला.स्मशानभूमीची साफसफाई केल्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा शिबिरार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.साफसफाई करतेवेळी गावकरी विशेषतः महिला वर्ग उत्सुकतेने बघत होते.या सफाई अभियानात सरपंच सतीश हजारे  श्री प्रमोद आंबटकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.शामला वैद्य,प्रा. सुषमा थोटे गटप्रमुख कु.वैष्णवी बुराडे, आशिष शिवरकर अनमोल मुन, पल्लवी उके,वैष्णवी गावंडे,पूजा मेश्राम, आरती शिवरकर, आचल दिघोरे, तेजस्वी मेश्राम, वैभव ढेवळे, ईश्वर मेश्राम, संमेक मून,करिष्मा शिवरकर मधुर पालीवाल,शुभम बोरकर, यश धारणे, कीर्ती वानखडे, संगीता शिवरकर, ऐश्वर्या शेंडे, पूजा इंगोले, पूजा मेश्राम, प्राजक्ता शिदोळकर, प्रियंका मराठे, आचल ढाणके, पायल कामठे, ऐश्वर्या मराठे, यांचे सह गावकरी सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post