महाशिवरात्रीनिमित्त दूध व फराळ वाटप

 श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने उद्या महाशिवरात्री निमित्त भव्य शोभायात्रा तसेच दूध व फराळ वाटप

राहुल कळमकर यांनी केले लाभ घेण्याचे आवाहन



खामगांव:- स्थानिक दाळफैल भागातील श्री नवयुवक मानाचे कावड यात्रेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या 18 फेब्रुवारी 23 रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये गौरक्षण रोड हनुमान मंदिरातील शिवलिंगावर सकाळी १० वाजता जलाभिषेक करण्यात येणार असुन भाविक भक्तांना फराळ व दुध वाटप दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. खामगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर. बुलढाणा मतदार संघाचे धर्मवीर आमदार संजय गायकवाड. बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक श्री अमोल अंधारे. बुलढाणा जिल्हा प्रमुख युवा सेना ऋषिकेश प्रतापराव जाधव. यांच्या हस्ते दुपारी ५:३० वाजता भगवान शंकर भोलेनाथ यांची आरती करण्यात येणार आहे. यानंतर भव्य शोभा यात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत ५ रथ राहणार असून यामध्ये भगवान शंकराची भव्य मूर्ती, शंकर-पार्वती यांच्या वेशभुषेतील बालक, पालखी राहणार असुन कलश धारी महिलांचा सहभाग राहणार आहे. सदर शोभायात्रा वराडे चौक,राणा गेट,फरशी,मढी,महाकाल चौक, मार्ग मुक्तिधाम येथे पोहोचल्यानंतर भगवान शिवजींच्या आरतीने शोभायात्रेचा समारंभ होईल. तरी शिवभक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा. व शोभायात्रेत मोठ्या संख्येने सर्व कावड धारी व शिवभक्त सहभागी व्हावे असे आव्हान कावळ्यात्रेचे अध्यक्ष राहुल भाऊ कळमकर यांनी केले आहे


Post a Comment

Previous Post Next Post