खामगावात चोरींच्या प्रमाणात वाढ
अमडापूर नाक्यासमोरील सायकल स्टोअर तर सजनपुरीत किराणा दुकान फोडली
खामगाव जनोपचार न्यूज:- शहरासह आता ग्रामीण भागातही चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून रात्री दरम्यान अमडापुर नाका येथील सायकल स्टोअर व सजनपुरी येथील किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी हात साफ केला
एकनाथ भागवत यांची सुनील सायकल स्टोअर व नेमाडे यांचे महाकाल किराणा दुकान चोरट्यांनी फोडली असून नगदी व मोबाईल लंपास केला याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे
Post a Comment