खा. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहर व तालुक्यात विविध उपक्रम
खामगाव (जनोपचार) :- भूमिपुत्र खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहर व तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
जाहिरात👆
काल खामगाव शहरात खा. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी रक्तदान शिबिर यशस्वी केले. तर खा. जाधव यांच्याहस्ते खामगाव विधानसभा क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन तसेच गरजू महिलांना साडीचोळीचे वितरण करण्यात आले.
यासह विविध उपक्रमांमध्ये महादेवाला जलाभिषेक, महापुरूषांना माल्यार्पण, चारा वाटप, शासकीय रूग्णालयात जेवण वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, ब्लँकेट वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय अवताळे, तालुका प्रमुख सुरेश वावगे, शहर प्रमुख अॅड. रमेश भटटड, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश देवताळु, युवासेनेचे शहर प्रमुख राहुल कळमकार, राजेंद्र बघे, विक्की सारवान, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख इंदूताई राणे, जयश्रीताई देशमुख, प्रदीप ब्राम्हणकर, बहादूर बघे, नारायण सावरकर, बबलु मानकर, सुनिल नवले यांच्यासह मोठ्यासंख्येने कायकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.8
Post a Comment