खामगाव (जनोपचार) :- बुलडाणा जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयव व आवश्यक सहाय्यक उपकरणे मोफत पुरविणेकरीता तपासणी शिबीराचे आयोजन दि 1/12/2022 रोजी मोताळा, बुलडाणा, चिखली या तीन तालुक्यातील दिव्यांग बांधवानी सामाजिक न्याय भवन चिखली रोड बुलडाणा येथे सकाळी 9.00 ते 4.00 च्या दरम्यानं हजर राहावे व दिनांक 02/12/2022 रोजी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या तालुक्यातील दिव्यांग बांधवानी सामाजिक न्याय भवन चिखली रोड बुलडाणा येथे सकाळी 9.00 ते 4.00 च्या दरम्यान हजर राहावे
दिनांक 5/12/2022रोजी मलकापुर, नांदुरा ज.जामोद या तीन तालुक्यातील दिव्यांग बांधवानी निवासी मुकबधीर विदयालय दशहरा मैदान खामगांव येथे सकाळी 9.00 ते 4.00 च्या दरम्यान राहावे व दिनांक 06/012/2022 खामगाव, शेगाव, संग्रामपुर या तालुक्यातील तीन तालुक्यातील दिव्यांग बांधवानी निवासी मुकबधीर विदयालय दशहरा मैदान खामगांव येथे सकाळी 9.00 ते 4.00 च्या दरम्यान हजर राहावे त्याअनुषंगाने जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो इ. कागदपत्रसइ वरील दिनांका नुसार नियोजित तपासणी शिबीराकरीता जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्या वतीने करण्यात येत आहे.अशी माहितीइ प्राचार्य निवासी मूकबधिर विद्यालय,खामगाव यांनी दिली
Post a Comment