17 वर्षीय तरुणी गर्भवती राहून दिला बाळाला जन्म; जीवंत(?)अर्भक शेतातील जमीनतच गाडले;
चाईल्ड वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून प्रकरण आले उघडकीस
मलकापूर (जनोपचार) दोन अज्ञात तरुणांनी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना मलकापूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात घडली होती. दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने तिने 26 नोव्हेंबर रोजी अर्भकास जन्म दिला.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेला
माहितीनुसार ऑगस्ट महीन्यात तालुक्यातील १७ वर्षीय
अल्पवयीन मुलीला अज्ञात दोघांनी रस्त्यावर अडवले व जबरदस्ती अत्याचार
केला. त्यानंतर दोघेही पसार झाले. त्या मुलीने आरडाओरड केली मात्र आजूबाजूला कुणीच नव्हते. या घटनेनंतर पिडीत मुलीने कसेबसे घर गाठले व घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र बदनामीच्या भितीपोटी घरच्यांनी प्रकरण दडपले! त्यानंतर पिडीत मुलगी गर्भवती राहिली व तिने २६ नोव्हेंबर रोजी
अर्भकास जन्म दिला. त्यामुळे तिच्या घरातील मंडळी चांगलीच
हादरली व त्यांनी परिसरातील शेतात अर्भकाला जमिनीत दफन केले. त्यानंतर गावातीलच अज्ञात व्यक्तीने चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट
मुंबईकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने बुलढाणा येथील चाईल्ड वेलफेअर ट्रस्टची टिम मलकापूर तालुक्यात दाखल झाली.
पिडीत मुलीला बुलढाणा येथे नेण्यात आले व तिचा जवाब
नोंदविण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार ग्रामस्तरावरील
बालकल्याण समितीने पोलीसात तक्रार दाखल केली.अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीने
बदनामीच्या भीतीपोटी अर्भक जमिनीत पुरवले होते मात्र चाईल्ड
वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून सदर प्रकरण उघडकीस आले. या
नंतर मलकापूर ग्रामीण पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध
बलात्कार व पोस्की अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment