*बीएसएनएलचे अधिकृत टिआयपी (टेलिकाॅम इन्फास्ट्रक्चर प्रोव्हायडर) डिजी-टेक ऑप्टीक नेटवर्क चे उदघाटन संपन्न*
*आता सम्पूर्ण घर करा वायफाय!कसं ते पहा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/7Uu244PQIiA
खामगाव ::जनोपचार::--स्थानिक सावजी लेआउट डीपी रोड खामगाव येथील डिजी-टेक ऑप्टीक नेटवर्कचे उदघाटन भारत संचार निगम लिमिटेड बुलढाणा जिल्ह्याचे सहाय्यक महाप्रबंधक माननीय पंडितराव पाटील साहेब यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले खामगाव शहरातील नागरिकांकरिता डिजीटेक ऑप्टिक नेटवर्क ची सेवा सर्व ग्राहकांसाठी योग्य दरात अविरत सुरू झाली आहे . बेसिक प्लॅन पासून ऍडव्हान्स प्लॅन पर्यंत वेगवेगळ्या स्पीडनुसार प्लॅन ग्राहकांना निवडता येतील . फायबर नेटवर्कद्वारे ग्राहकांना 24 तास इनकमिंग आउटगोइंग कोणत्याही नेटवर्कवर कॉल करणे हे मोफत असणार असून घरातील लॅपटॉप अँड्रॉइड टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर संपूर्ण घर वायफाय युक्त करता येईल. डिजिटल इंडिया या संकल्पनेतून फायबर टू होम सर्विसेस चा खामगाव शहरातील नागरिकांनी तात्काळ भारत संचार निगम लिमिटेड या स्वदेशी कंपनीच्या अधिकृत टीआयपी डिजिटेक ऑप्टिक नेटवर्क शी तात्काळ संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा. या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बीएसएनएल कडून अधिकारी वर्ग श्री. रणधीर कुमार श्री. राजगुरे ,श्री गायकी , श्री. ठोसर. श्री. इंगळे , श्री.केवल पाटील , श्री. दिपके श्री. विजय कांबळे ,तथा सुटाळा खुर्द ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री. जयेश वावगे, ग्रामपंचायत सदस्य श्री.योगेश देशमुख पूजा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष जेडी झिने साहेब, सावजी लेआउट परिसरातील श्री. श्रीकृष्ण चव्हाण सर नारायण गार्डन परिसरातील श्री. करांगळे सर उदासी लेआउट परिसरातील श्री. विवेक राऊत श्री. खापर्डे तथा डिजी-टेक ऑप्टीक नेटवर्क तर्फे पंकज नजरधने, प्रशांत गवई उपस्थित होते व पत्रकार बांधवांन तर्फे श्री नितेश मानकर, श्री गणेश पानझाडे उपस्थित होते. डिजी - टेक ऑप्टीक नेटवर्क चे संचालक अंजित झिने यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
Post a Comment