प्रसार माध्यमांनी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य द्यावे - बी.के. पूनमदिदी
खामगाव (जनोपचार) वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे (मीडिया) समाजात चांगली भूमिका बजावित असून वृत्तपत्रांमध्ये झळकणाNया वृत्तांमुळे समाज मनावर परिणाम होतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी नेहमीकरिता समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सकारात्मक व आध्यात्मिक बातम्यांना प्राधान्य देवून ठळकपणे स्थान दिले पाहिजे, अशी आशा बी. के. पूनमदिदी यांनी मीडियाबद्दल व्यक्त केली.
खामगाव ब्रह्मकुमारीज्च्या वतीने तणावमुक्ती बी.के. पूनमदिदी इंदौर, यांचा येथे ‘अलविदा तणाव’ हा ९ दिवसीय कार्यक्रम पार पडला. त्यादरम्यान ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक ब्रह्मकुमारीज् वेंâद्रावर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
यावेळी आध्यात्मिक, मेडिटेशन, सकारात्मकता आदी विषयांवर बोलतांना त्यांनी जीवनात मेडिटेशनचे खूप महत्व असल्याचे सांगितले. मेडिटेशन केल्याने ताण- तणाव दूर होवून मन:शांती लाभते. एवढेच नव्हे तर एकाग्रता व निर्णय क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात मेडिटेशन स्विकारले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांबाबत बोलतांना समाजामध्ये प्रसारमाध्यमाला अढळ स्थान आहे. कारण वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द होणाNया बातम्यांचा समाजमनावर खोलवर परिणाम होतो. नकारात्मक बातम्यांमुळे समाजात नकारात्मकता वाढते. प्रसार माध्यमांनी समाजाला प्रेरणा देणाNया तसेच आदर्श घेतल्या जाईल अशा प्रकारच्या सकारात्मक बातम्यांना विशेष स्थान देऊन समाज प्रबोधनाची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कारण वर्तमान पत्रात जनमत सकारात्मक करण्याची ताकद असल्याने सकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणात देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक बातम्यांमुळे समाजाला योग्य दिशा दिल्या जाते. त्यामुळे प्रामुख्याने आध्यात्मिक बातम्या देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे. सकारात्मक मार्गदर्शनाला विशेष स्थान प्रसारमाध्यमांनी द्यावे, असे मत बी.के. पूनमदिदी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी ब्रह्मकुमारीज् वेंâद्राच्या बी. के. सुषमादिदी यांचीही उपस्थिती होती.
Post a Comment