शाब्बास मुलींनो..खामगाव च्या चमू

 संपर्क नितेश मानकर खामगाव 8208819438


विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत महिला महाविद्यालयाच्या चमुंना चॅम्पियनशिप  


खामगाव (जनोपचार) श्रीमती सुरज देवी रामचंद मोहता महिला महाविद्यालयाच्या बॉक्सिंग जमुना नुकत्याच अकोला येथे  संपन्न झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत 63-66 वजन गटात कु. मुस्कान एन तडवी  हिने आपल्या खेळकौशल्याद्वारे प्रतिस्पर्ध्याशी झुंज देत  सुवर्णपदाची मानकरी ठरली आहे. कु.नेहा एम पवार 57-60 वजन गटात हिने सुद्धा चुरशीची लढत देत रजत पदाची मानकरी ठरली आहे.कु.भाग्यश्री एस

खेडकर हीने सुध्दा 66-70 वजन गटात रजत पदकाची मानकरी तसेच कु.स्नेहल व्ही.डाबेराव हीने  60-63 वजन गटात  रजत पदकाची विजेती ठरली.कु.वृषाली. एक्स. खंडेराव हीने सुध्दा

50-52 वजन गटात  काट्याची लढत देत कांस्य पदकाची मानकरी ठरून  सर्व बाॅक्सर विद्यापीठ रनर अप चॅम्पियनशिपच्या मानकरी ठरल्या आहेत.तसेच अकोला येथेच झालेल्या तायकांडो स्पर्धेत 60-63 वजन गटात कु स्नेहल  व्ही.डाबेराव ही कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.त्यांनी केलेली कामगिरी खरच वाखण्याजोगी आहे.  त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती चांदे, संस्थेचे अध्यक्ष मा. दिनेशजी  संघवी,मा.मनोजभाई नागडा,मा.पशमीनजी नागडा,प्रो.डाॅ.सीमा देशमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंन्द यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post