राज्यातील भाजपा सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड केली- आ.ॲड.आकाश फुंडकर

 राज्यातील भाजपा सरकारने गोरगरीबांची दिवाळी गोड केली- आ.ॲड.आकाश फुंडकर



राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेजी व उपमुख्यंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने अवघ्या 100 रुपयांमध्ये रेशन धारकांना अनंदाचा शिधा जाहीर केला होता. आज वसूबारसच्या शुभ मुहूर्तावर मतदार संघातील मौजे भालेगाव बाजार येथे आनंदाचा शिधा किट वाटपाचा शुभारंभ आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

गेली दोन वर्ष कोराना महामारीमुळे राज्यात विविध सणांवर निर्बध लादण्यात आले होते.  अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले होते.  त्यामुळे गोर गरीबाची दिवाळी ही गोड व्हावी यासाठी राज्य़ शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेत अवघ्या 100 रुपयांमध्ये गोरगरीबांसाठी दिवाळीत आवश्य़क रवा, चनाडाळ, तेल, आणि साखर यांचा समावेश असून यामुळे गोरगरीबाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असेही यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.

यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा प्रदान केल्या व गोरगरिबांची दिवाळी आनंदाची केल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी (महसूल) श्री.राजेंद्र जाधव साहेब, तहसीलदार श्री. अतुल पाटोळे, पुरवठा निरीक्षक श्री. विशाल भगत व स्वस्त धान्य दुकानदार श्री. पि.पि. ढोण उपस्थित होते.

तर आज खामगांव शहरातील छत्रपति शिवाजी नगर, शंकर नगर, गोपाळ नगर, चांदमारी या भागात आनंदाची शिधा आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post