जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने पक्षांकरीता जल प्याऊचे वाटप
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने जल है तो कल है या प्रकल्पाअंतर्गत दि. 30 एप्रिल 2025 रोजी शहरातील विविध परिसरात पक्ष्यांकरीता जल प्याऊचे वाटप करण्यात आले. यावेळी 50 पेक्षा जास्त जल प्याऊचे वाटप करण्यात आले. हे जल प्याऊ माती पासून बनविलेले असुन उन्हाळ्यात पक्षांकरीता थंड पाणी उपलब्ध होणार आहे. सदर प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी जेसीआयचे प्रेसीडेन्ट जेसी साकेत गोयनका, प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी श्रेयस कलंत्री, पास्ट प्रेसीडेन्ट अमरजितसिंग बग्गा, जेसी आदित्य डिडवाणीया, जेसी योगेश धुत हे उपस्थित होते.
![]() |
जाहिरात |
Post a Comment