देव दर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला
उभ्या ट्रॅकवर कार धडकून तिघे ठार :पाच जण गंभीर जखमी
खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क : रात्री दरम्यान टायर खराब झाल्याने रोडवर उभे असलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील ईरटीका कार जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना काल रात्री राष्ट्रीय महामार्गावरील खातखेड फाट्यानजीक घडली. मृतांमध्ये पती - पत्नी व मुलाचा समावेश आहे.
![]() |
जाहिरात |
माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील पवार. कुटुंबीय देव दर्शना करीता गेले होते. दरम्यान काल रात्री ते ईरटीका कार क्रमांक एम.एच- २६ सी. इ- ६२४५ ने देव दर्शनावरून घरी परत निघाले होते. यावेळी नांदुरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खातखेड फाट्यानजीक त्यांची भरधाव वेगातील कार रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅकवर मागून जोरात धडकली. हा अपघाता इतका भीषण होता की, त्यात कार मधील देवराव गंगाराम पवार(६०), त्यांच्या पत्नी बबिता देवराव पवार(५५) व त्यांचा मुलगा निकेतन देवराव पवार (२६) हे तिघे जागीच ठार झाले तर कार मधील मोनिका देवराव पवार, भूमिका रामराव पवार, प्रियंका देवराव पवार, हितांश जीवन राठोड व कारचालक संतोष भगवान कदम हे गंभीरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन सह परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या जखमींना ताबडतोब बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या अपघातात ईरटीका कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी निलेश राठोड (४२) यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी रोडवर निष्कळीपणे ट्रॅक उभा करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment