जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स ऑफ अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय आवार, आवारचा १0 वीचा निकाल १०० टक्के

खामगाव  जनोपचार न्यूज नेटवर्क: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, आवार या संस्थेने इ. १0 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १००% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. 10 वीच्या  सर्वच विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे.या उत्तुंग यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर यांना दिले जात आहे. त्यांच्या दूरदृष्टी, शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमळ मार्गदर्शनामुळेच महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे. त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.


महाविद्यालयातील यशाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

🔹 अनेक विद्यार्थ्यांनी 9०% पेक्षा अधिक गुण मिळवले असून गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

🔹 विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.

🔹 शिक्षकांनी नियमित अभ्यासवर्ग, मार्गदर्शन सत्रे, परीक्षा पूर्व तयारी यावर भर देत विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिले.

🔹 प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, डिजिटल माध्यमांद्वारे शिकवण्याची आधुनिक पद्धत अंगीकारण्यात आली आहे.

जाहिरात

या यशाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, पालक वर्ग, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आज दि. १३ मे २०२५ रोजी दहावी चा निकाल घोषित  करण्यात आला यामध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स सायन्स कनिष्ठ महाविद्यालय  आवार मधून गुणवंत विध्यार्थी  प्रगती मेतकर ९५. ६०%, श्रुती लहुडकार ९४. ४०%, अनुष्का देशमुख ९३. ६०%, श्रुती भोरे ९३. २०%, शेजल खराटे ९२. ६०%, अनुजा ढोरे ९२. ६०%, ऋतुजा  टिकार ९१. ६० %, सानिका थेटे ९१. ४० %, चेतन पांढरे ९१. ०० %, जान्हवी ढोरे ९०. ४० %, प्रणाली मेतकर ८९. ८०%, जागृती रबडे ८९. ८० %, पूजा वांढे ८९. ८०%, आदित्य चिमकर ८९. ६०%, मेघा लगर  ८९. ६०%, ऋतुजा काळणे ८९. ६०%, अर्जुन कापले ८९. ६०%, आर्यन नेरकर ८८.००%, रोशन तायडे ८९. ००%, मयूर पाटेखेडे ८८. ८०%, शेजल राजगुरे ८८. ८०%, आर्या जोहर्ले ८७. ६०%, तुषार सावरकर ८७. २०%, साक्षी कवळे ८७. २०%, निखिल माळी ८६. ६०%, यश टिकार ८६. ४०%, कृष्णा घोरड ८६. ४०%, लक्ष्मी जमवे ८६. २०% , अश्विनी मंजुळकर ८५. ८०%, भक्ती थोरात ८५. ८०%, जागृती मारवाडी ८४. ८०%, रुचिता बहादरे ८४. ६०%, चैतन्य वानखडे ८४. ००% , श्रीश करे ८३. ८०%, गजानन नेमाने ८३. २०%, अजय ठक ८३. ७०%, ओम मुजुमले ८३. ००%, प्राजली गावंडे ८३. ००% , नागेश बघे ८२. ८०%, समर्थ अर्जुन ८२. ८०%, राहुल ढोरे ८२. ८० %, पार्थ पाटील ८१. ८०%, प्रशिक सपकाळ ८१. ४०%, आनंद दुटे ८१. ४०%, सिद्धांत खरात ८१. २० %, विवेक महल्ले ८१. २०%, तृप्ती गव्हाणे ८१. २०%, अभिषेक डिक्कर ८१. २०%, समर्थ चव्हाण ८०. ८०%, दिव्या भातूरकर ८०. ४०%, प्रतिक हिरडकर ८०. ४०%, लखन गव्हादे ८०. ८०%, आदित्य इंगळे ८०. ८०%, वृषभ अंभोरे ८०. ००%. मार्क मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post