पाक ला शिक्षा.......
सार्हिकल स्ट्राइक पेक्षाही भयानक वॉटर स्ट्राइक
पाणी बंदीचे परिणाम काय होणार पाक वर
भारताने 1960 च्या सिंधू जल कराराला (Indus WatersTreaty - IWT) स्थगिती दिल्याने पाकिस्तानला आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा मिळाली आहे. हा करार 1965, 1971 आणि कारगिल युद्धांसह अनेक दहशतवादी हल्ल्यांनंतरही टिकून होता. मात्र, आता भारताने पश्चिमेकडील नद्या- सिंधू, झेलम आणि चिनाब आणि त्यांच्या उपनद्यांचा पाणीपुरवठा त्वरित थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानच्या चारपैकी दोन प्रांतांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र काळात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रभावित होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याची शक्यता आहे, तर आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार पाणी रोखणे हा युद्ध घोषित करण्याचे वैध कारण मानले जाते
Post a Comment