जाचाला कंटाळून सरपंच पतीची आत्महत्या !
रोहणा येथे संतोष देशमुख हत्याकांडाला साजेशी घटना
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- रोहना गावातील माजी मंडळ अधिकारी तथा माजी सरपंच पती तुकाराम चंद्रभान डांगे आणि एकाच्या त्रासाला कंटाळून विद्यमान सरपंच पती संतोष गव्हाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी रोहणा शिवारातील एका शेतात उघडकीस आली. याप्रकरणी माजी समाज कल्याण सभापती गोपाळ गव्हाळे यांच्या यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
![]() |
जाहिरात जाहिरातीसाठी संपर्क 820 881 9438 |
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या हकीकत प्रमाणे यातील फिर्यादी यांनी रिपोर्ट दिला की, नमुद घतावेळी व ठिकाणी त्यांचा भाउ मृतक यास आरोपी क्र 1 व 2 यांनी खोट्या तक्रारी करुन शारिरीक व मानसिक त्रास देवुन छळ करीत होते. व विनाकारण शिवीगाळ करून धमक्या देत होते त्यांचे आसाला कंटाळुन मृतक यांनी त्यांचे शेतात निंबाचे झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. त्यांचे मरणास आरोपी क्र 1 व 2 हे कारणीभुत आहेत. अशा रिपोर्ट दिल्याने अपराध सदरचा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोनिसा आदेशाने सपोनि रवि मुंडे यांचेकडे देण्यात आला.
Post a Comment