बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण तसेच स्थानकामध्येआद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद सावळे यांचा फोटो लावा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - खामगांव बस स्थानकांच्या प्रवेश व्दाराला साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण करण्यात यावे व खामगांव बसस्थानक मध्ये साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे फोटो लावण्यात यावा असे निवेदन लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने खामगाव आगार प्रमुखांना देण्यात आले.



निवेदनात नमूद आहे की, साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा खामगांव शहर मध्ये एकही पुतळा नाही तसेच चौकाचे नामकरण सुध्दा नाही देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली तरी खामगांव ता खामगांव जि बुलढाणा येथे साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व नामकरण झालेले नाही डॉ अण्णाभाऊ साठेची मानवीय अधिकारता मोठे योगदान असुन खामगांव शहरातील बस स्थानकांच्या प्रवेश व्दाराला साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात यावे व खामगांव बसस्थानक मध्ये साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे या महापुरुषाचे फोटो लावण्यात यावे यातुन आजच्या नविन पिढीला प्रेरणा मिळेल अशी मागणी लहुजी विद्रोही सेनेचे बुलढाणा जिलाध्यक्ष मा लहुश्री रुपेश भाऊ अवचार व खामगांव शहर व परीसरातील सर्व मातंग समाज करीत आहे हि मागणी पुर्ण करावी असेही नियोजनात नमूद आहे सवदर निवेदन सागर अवसरमोल सचिन अवचार सखाराम बोरकर सुमीत हेलोडे सुमीत नाटेकर यांनी दिले

Post a Comment

Previous Post Next Post