मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन शेगावमध्ये :पहिली आढावा बैठक



शेगाव  : मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे होणार असल्याची माहिती  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव नगरीमध्ये  पहिली आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्याचा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीमध्ये घेण्याचा निर्णय नांदेड येथील बैठकीत झाला होता. त्यानंतर संतनगरी शेगाव मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक पार पडली. यावेळी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे,प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ,डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, राजेश डीखोळकर, गणेश चौकशे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आगामी राष्ट्रीय अधिवेशना संदर्भात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी माहिती दिली. अधिवेशन यशस्वीरित्या यशस्वी करण्याचे आव्हान यावेळी एस.एम.देशमुख सरांनी केले. या आव्हानाला प्रतिसाद देत शेगाव येथील पदाधिकारी राजेश चौधरी,धनराज ससाने,नंदू कुलकर्णी,अनिल उंबरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून  परिषदेची शेगाव टीम सज्ज असून तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यावर मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी बुलढाणा जिल्हा सक्षम असून बुलढाणा जिल्हा या अधिवेशनाची सर्व  ताकदीनिशी जबाबदारी उचलणार असल्याची ग्वाही देत अधिवेशन यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला. परीषदेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी अधिवेशनाला ज्या ज्या अडचण येतील त्या  सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे उपस्थितांना आश्वासित केले. परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्याकडे या अधिवेशना संदर्भात  वेळोवेळी आढावा घेण्याचे आदेश यावेळी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख  यांनी दिले. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांनी जिल्ह्यातील तेराही तालुक्यात परिषदेच्या शाखांचे गठन झाले असून तेराही शाखेचे पदाधिकारी वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून अधिवेशनात सहभागी होतील अशी माहिती दिली. प्रारंभी मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर,सौ शोभना देशमुख, प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे या पदाधिकाऱ्यांचा शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदू कुलकर्णी,उपाध्यक्ष संजय त्रिवेदी, कार्याध्यक्ष राजकुमार व्यास,सचिव नितीन घरडे,कोषाध्यक्ष मंगेश ढोले, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे,राजवर्धन शेगावकर,शेगाव तालुका उपाध्यक्ष इस्माईल,गजानन ददगाळ आदींनी सत्कार केला. युवा क्रांती न्यूज चे संपादक विजय यादव यांनी परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या सह मान्यवरांचा भगवे दुपट्टे व श्री संत गजानन महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

बैठकीला मराठी पत्रकार परिषद शाखा खामगाव तालुका अध्यक्ष महेश देशमुख,शहराध्यक्ष गणेश पानझाडे,संग्रामपूर तालुकाध्यक्ष विवेक राऊत,स्वप्निल देशमुख, ज्ञानेश्वर दांदळे आदीसह घाट्याखालील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संचलन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले. तर आभार शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदू कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post