महात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा, पुणे येथे अभिवादन!
11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, आणि या पवित्र दिवशी पुण्याच्या फुलेवाडा या ऐतिहासिक स्थळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांच्या सोबत जाऊन अभिवादन केले.
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते तसेच शिक्षण, स्त्री-समानता, जाती व्यवस्थे विरोधातील संघर्ष, शेतकरी आणि कामगारांचे हक्क — अशा अनेक लढ्यांचं मूळ महात्मा ज्योतिबांच्या विचारात आहे. त्यांचा प्रत्येक विचार आजही तितकाच प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहे , असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले .फुलेवाडा येथे जाऊन अभिवादन करणं, ही फक्त एक परंपरा नव्हे – तर विचारांशी निष्ठेची जाणीव आहे.फुलेवाडा ही केवळ एक वास्तू नसून, ती क्रांती, समता आणि जागृतीचे प्रतीक आहे.
आजच्या भेटीदरम्यान त्या पवित्र मातीला स्पर्श करताना जाणवलं "हा लढा अजून पूर्ण झालेला नाही, आणि आपल्याला तो पुढं नेण्याचीच खरी जबाबदारी आहे." असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी मा.आमदार मोहन जोशी,मा. मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा मंत्री रमेश बागवे , मा. आमदार श्रीमती दिप्तीताई चौधरी , किशोर कन्हेरे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राजीव गांधी पंचायत राज संघटन चे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, राष्ट्रीय संयोजक अविनाश उमरकर , अजय तायडे, प्रदेश प्रतिनिधी प्रशांत सुरसे, नंदकिशोर नगरकर चंद्रपूर, निळकंठ बोरोळे दर्यापूर, खामगाव क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोदभाऊ चिंचोळकार, डॉ शंकरराव क्षिरसागर, धन्नालाल नगरीकर गोंदिया, प्रमोद वैद्य औंढा ना . राहुल झगडे यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment