बहुचर्चित खडदगाव खून खटल्यातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता..!

खामगांव सत्र न्यायालयाच्या निकाल

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की दि.9 10 2020 रोजी खदडगाव ता नांदुरा येतील नदी पात्र मयत दिलीप महादेव खंडारे हा बेशुद्ध पडला होता गावकऱ्यांनी त्या प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे नेले असता dr. चेतन बेंडे यांनी त्याचा मृत्यू पूर्व जबाब घेऊन पुढील उपचार साठी मेडिकल अकोला येते पाठवले. 

मयत ने आपल्या मृत्यू पूर्व जबाब मध्ये आरोपी प्रकाश बरकु क्रु राडे किशोर रामभाऊ गायकवाड अमोल रामभाऊ गायकवाड यांनी मला मारहाण करून विष पाजले असे त्यांनी आपल्या जबाब मध्ये सागितले त्या नुसार पोलीस ठाणे पि.राजा येथे कलम 302 307 143 149 323 34 अन्वये गुन्हा दाखल झाला व प्रकरण न्याय प्रविष्ट झाले

प्रस्तुत प्रकरण खामगांव येथील न्यायालयात सत्र खटला क्र.13/22 कलम 302 307 323 34 भा. द वी. नुसार चालवण्यात आले.सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले तसेच दोन्ही वकिलाच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचा वकिलाच्या युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला व आरोपींची  सदर आरोपातून दि.18/3/2025 रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली.तिन्ही आरोपींच्या वतीने ॲड.निलेश मानकर पाटील यांनी  बाजू मांडली व युक्तिवाद केला.

ॲड.निलेश मानकर पाटील


Post a Comment

Previous Post Next Post