कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची  गळफास घेऊन आत्महत्या !



अंढेरा ;  डीराजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत इथून जवळ असलेल्या सुरा येथील अल्पभूधारक शेतकरी मोतीराम चेके वय ७०  यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील आंब्याच्या  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना  २१ मार्च शुक्रवार सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली.  गट नंबर 42 आणि 53 स्वतःच्या नावे ५  एकर जमीन आहे. व . सततचा कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. एखाद्या वर्षी पीक चांगले आले तर सरकार शेतकऱ्याच्या मालालाचा भाव कोणत्या ना कोणत्या देशातून माल आयात करून भाव पाडल्या जातात. गेल्या अनेक दिवसापासून कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली ते आर्थिक विवेचनेत होते. यावर्षी सुरा परिसरामध्ये  कमी पाऊस झाल्याने सर्व पिकाचा उतारा हा कमी आला व मागील वर्षी जिल्ह्यात वादळी वारस अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यामुळे सुरा येतील  सुद्धा दिनकर मोतीराम चेके यांचे मोठे प्रमाणात  नुकसान झाले. दिनकर मोतीराम चेके यांच्या कुटुंबाच्या सदस्याकडून ही माहिती घेण्यात आली की यांच्यावर खाजगी महिंद्रा कोटक बँक ४ लाख रुपये कर्ज.तर सेंट्रल बँक७० चे कर्ज घेतले आहे.. सततची नापिकी. व शेतीला लागलेला खर्च. सरकारचे आयात निर्णयाचे धोरण . आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे दिनकर मोतीराम चेके यांचे मनोधर्य खचले .व घरातील लोकांना न सांगता २० मार्च रोजी रात्री दहा वाजता घरून निघून गेली असता व  घरी परत न आल्यामुळे . तुमच्या घरच्या लोकांनी त्यांना  आजु बाजूला पाहणी करून काही मंडळींना विचारणा करीत पाहणी सुरू केली .तेवढात त्याच्या शेतात त्यांचे मोटरसायकल उभी आढळून आली गाडी जवळ जाऊन पाहिलेत असतात त्यांच्या शेता शेजारी  असलेल्या कृशीवर्ता रामकिसन चेके यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास  घेऊन त्यांनी स्वतःला संपविणे २१ मार्च शुक्रवार सायंकाळी  त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. मृतक चेके यांच्या पश्चात्य पत्नी. दोन मुले. दोन मुली. सुना. नातवंडे असा आप्तपरिवार आहे.या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली . पोहेका   . रामेश्वर आंधळे भागवत गिरी यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव मही येथे नेण्यात आले.व ठोक कुल वातावरणात त्यांच्यावर सुरा येथे रात्रीच्या वेळी ला अंत्यसंस्कार करण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post