भाटे यांच्या घरात चोरट्याचा प्रवेश.... लाखोचा ऐवज घेऊन चोरटा पोभारा करण्याच्या स्थितीत.... वेळेवर पोलीस दाखल.... आणि चोरट्याने भरलेली पिशवी पोलिसांच्या अंगावर फेकून केला पोबारा.... ही कोणती कहाणी नसून रात्री घडलेला प्रकार आहे खामगाव येथील....
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार..एडवोकेट केतन भाटे यांची वहीनी घराला कुलूप लावुन अयोध्या येथे गेली आहे .दरम्यान रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने घराच्या दरवाजाचे कुलुप ताडुन घरात प्रवेश केला.घरातील लाइट लावुन तोडफोड करीत असतांना त्याचा आवाज आल्याने एडवोकेट केतन भाटे यांचे वडील यांनी उठुन पाहील असता त्यांना घरातील लाइट चालु दिसल्याने व घरात कोणीतरी संशयीत इसम आहे याबाबतची चाहुल लागल्याने त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहरला घटनेची माहीती दिली .नाइट राउंड डयुटीवर असलेले पोउपनि मोहन करुटले व सहकारी यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी जाउन पाहणी केली असता कंपाउंड वालचे गेट आतुन बंद होते ते उघडुन आत प्रवेश केला असता एक इसम अंधाराचा फायदा घेउन मागील बाजुन भिंतीवरुन पळुण गेला तेव्हा वरील स्टॉफने पाठलाग केला परंतु तो मिळुण आला नाही. त्याने पळुण जात असतांना भिंतीवरुन घरातील चोरलेले दागीने व कॅश थैलीसह कापडी पिशवीत मिळुण आल्याने सदर पिशवी दोन पंचासमक्ष पाहणी केली
![]() |
घटनेची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घडत असलेल्या घटनेला थांबविणारे पोलीस अधिकारी मोहन करुटले. |
वरील चोरी गेलेला माल मिळुण आला. अज्ञात आरोपीने घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन कपाटातील वरील साहीत्य चोरण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे रिपोर्टवरुन गुन्हा दाखल करुन गुन्हयाचा तपास पोनि यांचे आदेशाने सपोनि मुळीक मा यांचेकडे देण्यात आला आहे.
Post a Comment