बापरे बाप.... फॉरेस्टच्या जमिनीत कांद्याची शेती? झाडेही गायब!!
विभागाचे अधिकारी झोपले आहेत काय?
खामगाव प्रतिनिधी: खामगाव वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या जंगल परिसरात अवैध शेती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून खामगाव वन अधिकारी झोपले की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार मांडणी शिवारातील मानखुरा बीट मधील नर्सरीत असलेल्या झाडांची कत्तल कडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची अवैध शेती सुरू असल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये आहे. आता या ठिकाणी कोण शेती करते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जिसकी लाठी उसकी भैस ही म्हण येथे सार्थकी ठरत असून ही अवैध शेती कोण करत आहे याचा शोध वरिष्ठांनी घ्यायला पाहिजे. तेथील नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर फोटो देखील मीडियाला उपलब्ध करून दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे परिक्षेत्रात येत असलेल्या खेरडी शिवारात देखील अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समजते.
Post a Comment