आईची बाजू घेतो म्हणून बापाने केला मुलाचा खून

जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आजन्म करावासाची शिक्षा

हिंगोली:- आईची बाजू घेतो म्हणून पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या बापाला न्यायालयाने हा जन्म कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती सौ सरोज माने /गाडेकर यांनी हा निकाल दिला. कारावासाच्या शिक्षा सोबतच 75 हजाराचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

याबाबत पार्श्वभूमी अशी की, हिंगोली जिल्हयातील येडशी, ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील बाबुराव भगवानराव शिकरे, वय ३५ वर्षे हयाने दि.२८/१२/२०१८ रोजी रात्री ९ वाजता पासून ते दि. २९/१२/२०१८ रोजीचे सकाळी ५ वाजता चे सुमारास त्याचा मुलगा वैभव बाबुराव शिखरे वय १४ वर्षे हा नेहमी आईची बाजू का घेतो याचा राग मनात धरून त्यास रात्रीचे सुमारास झोपेतून उठवून त्याच्या कडील अॅपे अॅटोमधील वैभव यास बसवून कुंभारवाडी शिवारात कुरतडीपाटीचे पश्चिमेस सार्वजनिक डांबरी रोडवर नेवून प्रथम त्याजवळील सुतळी दोरीने वैभव यास गळफास देउन त्यास मारहाण केली. तरी सुध्दा वैभव हा हालचाल करीत असल्याने व तो पूर्णतःमेला नसल्याने आरोपी पिता बाबराव शिखरे याने त्यास रोडच्या बाजूला पडलेला दगड डोक्यात मारून ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने आरोपीने त्याच्या मुलगा वैभव चे प्रेत पुन्हा ऍओ मध्ये टाकून मौजे येडशी गावात येवून फिर्यादी अरविंद गणेशराव शिखरे राहणार येडशी याच्या घरासमोरील पायरयावर टाकून दिले. या प्रकरणी आखडा बाळापूर पो.स्टे. येथे गु.र.नं. ४२१/२०१८ कलम ३०२,२०१ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद होवून, गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे व व्ही. एम केंद्रे यांनी केला. प्रस्तुत प्रकरणास न्यायालयात सत्र खटला क. ३१/२०१९ देण्यात आला. सदर प्रकरण हे हिंगोली जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती. सरोज एम. माने यांचेसमोर चालले. सदर प्रकरणात सहा. सरकारी वकील श्री. एन. एस. मुटकुळे यांनी एकुण १४ साक्षीदार तपासून युक्तीवाद केला यामध्ये फिर्यादी, वैदकीय अधिकारी डॉ. प्रिया संजय नाकाडे व तपासिक अमलदार श्री. जी.एस राहिरे व श्री. व्ही. एम केंद्रे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असुन जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती. सरोज एम. माने यांनी आज दि. ०५/०३/२०२५ रोजी सत्र खटला क. ३१/२०१९ महाराष्ट्र शासन विरूध्द बाबुराव भगवानराव शिखरे रा.येडशी ता. कळमनुरी. जि. हिंगोली या प्रकरणात आरोपी बाबुराव शिखरे यास कलम ३०२ भा.दं. वि. अन्वये आजन्म कारवासाची शिक्षा व रू. ५०,०००/- दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावास आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने स्वतःच्या मुलाचे प्रेत फिर्यादीच्या घरासमोरील पायरयावर टाकून पुरवा नष्ट केला म्हणून भा.द.वी २०१ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि २५,०००रू दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्यात. असा आदेश झाला आहे.

उपरोक्त प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. श्री. एन. एस. मुटकुळे यांनी बाजु मांडली त्यानां सहकार्य सरकारी वकील श्री.एस.डी. कुटे व श्रीमती एस.एस. देशमुख कोर्टपैरवी अधिकारी पोउपनि टी.एस. गुहाडे, कोर्ट पैरवी महिला कॉन्स्टेबल सुनिता धनवे मॅडम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post