स्विफ्ट डिझायरमध्ये आढळला पोलिसाचा मृतदेह; घातपाताचा संशय; देऊळगाव राजा रोडवरील घटना

 देऊळगाव राजा रोडवर रस्त्याच्या कडेला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह स्वतःच्या वाहनात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के (वय 38, रा. गिरोली खुर्द, ता. जळगाव) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते जालना हायवे पोलीस दलात कार्यरत होते.

Advt.

आज (30 मार्च) सकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा रोडवरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वन विभागाच्या जागेत स्विफ्ट डिझायर वाहन उभी असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. तपासणी केल्यावर गाडी लॉक अवस्थेत असल्याचे दिसून आले. गाडीत ज्ञानेश्वर मस्के यांचा मृतदेह आढळला.

Advt.


   प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणीसाठी पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post