शिक्षकाच्या विविध मागण्यांचे निवेदन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले
सविस्तर असे की,जि.प.माध्य.शिक्षक संघ ही राज्य पातळीवर विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षकांच्या समस्यांबाबत काम करणारे अग्रगण्य संघटन आहे. संघटनचे जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णु तायडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी मा.मु.का.अ. यांचे शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी संघटनेने निवेदन दिले.सदरील निवेदनात शिक्षकांची अंतिम सेवाजेष्ठता अद्यावत करुन यादी प्रकाशित करणे,त्यानुसार ३वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या करणे, मराठी शाळेवर मराठी शाळेवरीलच शिक्षकांना पदोन्नती देणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना वरीष्ठ विस्तार अधिकारी पदी पदोन्नत करणे,निवडश्रेणीचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे,पात्र माध्यमिक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदी पदोन्नती देणे,सर्व शाळेतील निम्न श्रेणी व उच्च श्रेणी शिक्षकांचे रिक्त पदे भरणे, बिंदु नामावली प्रक्रीया मार्गी लावणे,पवित्र पोर्टल द्वारे नविन शिक्षकाची पदे भरणे,शा.पो.आ.,मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, उपस्थिती भत्ता इत्यादी योजना जिल्हा परिषद शेष फंडातुन राबविणे, शाळा किरकोळ दुरुस्तीचे अनुदान देणे,जुन्या पेन्शन योजनेत पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करुन संबंधितांचे एन.पि.एस. रक्कम जिपिएफ खात्यात वळती करणे,प्रभारी मु.अ. ना अतिरिक्त मेहनताना अदा करणे, इ.६-८ वीचे नि.श्रेणी शिक्षकांना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नत करणे, रिक्त जागा असेल तिथे कनिष्ठ सहायक,वरिष्ठ सहाय्यक, परिचर इ. शिक्षकेतर कर्मचार्याना नियुक्ती देणे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे,अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्याकरिता जि.प. माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.तायडेसर,सचिव श्री कडसर, कार्याध्यक्ष श्री.तांबेकरसर, कोषाध्यक्ष श्रीपडघानसर, उपाध्यक्ष श्रीघुगेसर, कुलकर्णीसर,कन्नरसर,वांजोळसर,
नेरकरसर,मोरेसर,पाचपोळेसर,सतिष तायडेसर,मुअ.सैय्यदसर, श्रीमती घरडे मॅडम,गौर मॅडम,सावळे मॅडम,मुअ.सातवसर, कोळी मॅडम,चव्हाणसर,उबाळेसर,केदारसर, कुकडेसर,घुगेसर,मांटेसर,खोंदलेसर,जुबेरसर,हमीदखानसर,जाधवसर, इगळेसर,वाघसर,फंदाटसर, देशमुख मॅडम, इंगळेमॅडम,निकमसर,खरात मॅडम,मोहणेमॅडम,मादासकरसर ,पठाणसर,शिंदेमॅडम,शिंबरेसर,आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment