श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
खामगाव-J जनोपचार न्यूज नेटवर्क: श्रीराम नवमी जन्मोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल श्रीराम_जन्मोत्सव_समिती तर्फे खामगाव शहरात श्रीराम नवमी निमित्त दि ३० मार्च ते ६ एप्रिल च्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आज दि. 29 मार्च शनिवार सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
![]() |
पत्रकारांना निमंत्रण देताना अमोल भाऊ अंधारे सोबत खामगाव प्रेस क्लबचे उपाध्यक्ष नितेश मानकर सहसचिव मोहन हिवाळे आदि |
- अयोध्या धाम, महाराणा प्रताप उद्यान येथे आयोजित पत्र परिषदेत श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव अमोल अंधारे, विहिप चे जिल्हा मंत्री राजेंद्रसिंह राजपूत,संयोजक पवन माळवंदे, विहिप चे नगर मंत्री सचिन चांदुरकर तसेच प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत भुसारी उपस्थित होते. यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव अमोल अंधारे यांनी उद्या दिनांक 30 मार्च गुढीपाडवा हिंदू नववर्षापासून सुरू होत असलेल्या श्री राम जन्मोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.अमोल अंधारे यांनी बोलताना हिंदू धर्मातील सर्व तळागाळातील घटकांना सोबत घेऊन जातीभेद विसरून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून प्रभू श्रीरामांची काही उदाहरणे देऊन श्रीराम जन्मोत्सव हा लोकोत्सव कसा होत आहे.याबद्दल माहिती देत जन्मोत्सवास मोठे स्वरूप कसे प्राप्त झाले याबाबत माहिती दिली. तर शहरामध्ये विकास कामे सुरू असल्यामुळे शोभायात्रा मार्गामध्ये काही बदल होणार आहेत का ? या प्रश्नावर नागरिकांचे समाधान करताना अमोल अंधारे यांनी प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा मार्गाबाबत संबंधित नगरपरिषद, महावितरण कंपनी तसेच पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून शोभायात्रा मार्ग सुरळीत करण्याची विनंती सुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले.सोबतच विकास कामे सुरू असल्यामुळे थोडेफार अडथळे जरी असले तरी सर्वांनी विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी सहयोग देण्याची विनंती सुद्धा त्यांनी या माध्यमातून केली आहे. तर दिनांक सहा एप्रिल पर्यंत मार्ग सुरळीत होण्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदू धर्म बांधव भगिनी यांनी उत्साहात सहभाग घ्यावा.असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचलन श्रीकांत भुसारी यांनी तर आभार प्रदर्शन महेश देशमुख यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण तसेच विश्व हिंदू परिषद ला 61 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अयोध्या धाम येथे विशेष सेल्फी पॉईंट निर्मित केला गेला आहे.
.
Post a Comment