श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त संगीत श्री राम कथा व हरिनाम सप्ताहास प्रारंभ
लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून आवाहन
खामगांव (रत्नाताई डिक्कर) श्री वीर हनुमान संस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराज पगटदिनानिमित्त भव्य संगीत श्री राम कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन हिरा नगर , बाळापुर नाका खामगांव येथे करण्यत आले आहे . सदर श्री राम कथा आरंभ गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते समाप्ति गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहनार आहे . या श्री राम कथा सप्ताहात कथा वाचक ह. भ. प. श्री. संतदासगिरी महाराज , तोरनाळा यांच्या अमृतुल्य वानितुन संगीतम श्री राम कथा दररोज दुपारी 12 ते 4 वाजेपर्यांत असनार आहे . यासह दररोज विविध धार्मिक कार्यक्रम देखिल राहणार आहेत . तसेच दररोज श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सकाळी 7 ते 9 वाजता राहणार आहे . 20 फेब्रुवारी 25 ला श्री संत गजानन महाराज प्रगट दिन निमित्त ह. भ. प. श्री संतदासगिरी महाराज , तोरनाळा यांचे काल्याचे कीर्तन राहिल त्यानंतर भव्य महाप्रसाद व नगरातुन भव्यदिव्य श्री राम कथा ग्रंथाची नगर प्रदक्षिणा मिरवनूक काढन्यात येनार आहे . तरी सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री वीर हनुमान मंडळ हिरा नगर , खामगांवच्या वतीने करण्यत आले आहे .
Post a Comment