प्रेमातून शारीरिक संबंध; अल्पवयीन मुलीला गर्भधारणा: तरुणा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
बुलडाणा : प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीसोबत एका तरुणाने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने तीला गर्भधारणा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्याने दवाखान्यात आलेल्या मुलीची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर मुलीने सगळं काही सांगितले. शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचेही तिने सांगितले असले तरी मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा असून प्रशांत चव्हाण असे त्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर अल्पवयीन मुलगी आणि प्रशांत चव्हाण यांच्यात प्रेमसंबध होते. या संबंधातून प्रशांतने या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान नातेवाईकांच्या लग्नासाठी ही मुलगी तिच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गावी गेली होती. तिथे तिला पोटात दुखू लागल्याने बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. डॉक्टरांनी याबाबत बुलढाणा शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विचारणा केली असता तिने घडला घटनाक्रम कथन केला. त्यावरून प्रशांत चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment