ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटीकल सेंटरच्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
खामगाव जनोपचार: ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटीकल सेंटरच्या वतीने शहरातील बर्डे प्लॉट भागात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात बर्डे प्लॉट भागातील शहीद अब्दुल हमीद नगर परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये हे शिबीर शिबीर पार पडले. शिबिरात, एन्जिओप्लास्टी, बायपास, ई.सी.जी बी.पी. आर.बी.एस., युरीक अॅसीड, एच.बी., बी.एम.डी, शुगर या महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच विविध आजारांने त्रस्त असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार व औषध वाटप करण्यात आले. ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटीकल सेंटरचे संचालक डॉ निखिल ठाकरे,
(एम डी., इन्सेंटिव्ह कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट व डायबिटोलॉजिस्ट) यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजू रहेमान पटेल, मुकद्दर खान, सजनपुरीचे ग्रामपंचायत सदस्य बबलू शेख यांच्या सह ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर च्या वैद्यकीय स्टाफ ने पुढाकार घेतला. मागील आठवड्यात सजनपुरी तसेच पिंपळगाव राजा येथे सुद्धा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरांना सुद्धा चांगला प्रतिसाद लागला.
Post a Comment