खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किशोरआप्पा भोसले यांना extension व  अविरोध निवड !

खामगाव ः शहरातील पत्रकारांची मातृसंस्था व प्रतिष्ठीत संघटना म्हणून नावाजलेली संघटना खामगाव प्रेस क्लब, खामगावच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा पत्रकार किशोरआप्पा भोसले एक्सटेन्शन देण्यात आले असून त्यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

सभासद फी भरून होता येणार सदस्य!
 अध्यक्षपदी किशोरआप्पा भासले यांची निवड झाल्यानंतर खामगाव प्रेस क्लब खामागावची अधिकृत सभासद नोंदणी फी भरून सदस्य होता येणार आहे. यासाठी १९ जानेवारी पासून पत्रकार बांधवांनी पावती फाडून सभासद व्हावे, त्यानंतर पुढील निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. असेही सांगण्यात आले.

      खामगाव प्रेस क्लबच्या निवडणुकी संदर्भात सर्व सदस्यांची महत्वपुर्ण बैठक दि.१७ जानेवारी रोजी येथील पत्रकार भवन येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा बिन्नीवाले पत्रकारिता परस्कार प्राप्त राजीवजी तोटे साहेब होते तर पत्रकार अशोक जसवाणी, किरण मोरे,डॉ रियाज साहेब,आनंद गायगोळ यांच्यासह विविध वृत्तपत्राचे संपादक, प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. दरम्यान सर्व सदस्यांनी किशोरआप्पा भोसले यांची चांगली कार्यप्रणाली व सर्वांना सोबत घेवून चालण्याचा त्यांचा प्रयत्न पाहता पुन्हा एकदा त्यांची खामगाव प्रेस क्लब खामगावच्या अध्यक्षपदी सर्वानुमते हात उंचावून अविरोध निवड केली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकारांनी मनोगत व्यक्त करून किशोरआप्पा भोसले यांनी खऱ्या अर्थाने खामगाव प्रेस क्लब संघटनेला बळकटी देण्यासोबतच संकटाच्या काळात प्रत्येक सदस्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम केले आहे, त्यामुळेच अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांना मिळाले याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी लेखी ठराव घेत सर्वांनी स्वाक्षरी करून अध्यक्षपदी किशोरआप्पा भोसले यांची निवड निश्चित केली. तर पुढील कार्यकारणीचे अधिकार अध्यक्षांच्या स्वाधीन केल.  यानंतर पत्रकार भवन व टॉवर चौकात जोरदार फटाक्यांची आतीषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात पत्रकार बांधवांनी जल्लोष साजरा केला.

         या बैठकीला राजीव तोटे, शरद देशमुख, अशोक जसवानी,  अनिल खोडके,  श्रीधर ढगे, मोहम्मद फारुक, नितेश मानकर, मोहन हिवाळे, नाना हिवराळे, मनोज नगरनाईक, सुधाकर ठाकरे,तेहसिन शाह,श्रीकांत भुसारी, मुबारक खान, आनंद गायगोळ, आकाश पाटील, सुधीर टिकार, संभाजीराव टाले, सैयद अकबर, पंकज गमे, सुनील गुळवे, सुमित पवार, संतोष करे, आकाश शिंदे, सिध्दांत उंबरकार,  सूरज बोराखडे, विनोद भोकरे, रुपेश कलंत्री, अविनाश घोडके, गणेश भेरडे, सुमित शर्मा, मनोज जाधव, मिर्झा अकरम बेग, मो.अझहर, निखिल देशमुख, सूरज देशमुख, पंकज यादव, अजय लोखंडे, संतोष धुरंधर, मुकेश हेलोडे, शेख सलीम शेख फरीद, चंद्रकांत मुडीवाले, विनायक सावजी, अब्दुल रहेमान, सुभाष जोशी, मुन्ना सरकटे, उमेश गोधणे, विकास कुळकर्णी, बुढन कुरेशी, देवेंद्र ठाकरे,  यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.






--------------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post