जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने सेवा प्रकल्पावर २ लाखाचे वर साहित्याचे वाटप
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - चिखली बुलडाणा रोडवर उंद्रीपासून ९ किमी अंतरावर पळसखेड या गावात सेवा संकल्प प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे. या संस्थेचे संचालक डॉ. नंदकिशोर पालवे व त्यांच्या पत्नी सौ. आरती पालवे यांनी मतिमंद, अपंग, एचआयव्ही पॉझीटिव्ह, बेवारस व विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त अशा जवळपास ३०० लोकांना आश्रय दिलेला आहे.
सदर संस्थेत पालवे दांपत्याद्वारे औषधोपचार जीवन अशी विविध प्रकारची सोय ही केली जाते. अशा संस्थेची सहायता करणे हीच खरी मानवतेची सेवा म्हणून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जेसीआय खामगांव सिटी द्वारे अंदाजे २ लाखाचे वर साहित्य ज्यात औषधी, धान्य व कपडे यांची सहायता करण्यात आली. यावेळी सदर प्रकल्पाकरीता ज्यांनी निधी दिला त्यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. या लोकांना त्यांचा वाढदिवस सुध्दा माहित नाही. म्हणून २६ जानेवारी हा त्यांचा वाढदिवस असे मानून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे व त्यांच्या हस्ते केक कापल्या गेला. हा प्रकल्प खामगांव सिटीच्या सत्रातला पाचवा प्रकल्प आहे. यावेळी खामगांव सिटीचे अध्यक्ष साकेत गोयनका, सचिव विनम्र पगारीया, प्रोजेक्ट डायरेक्टर हिमांशू झंवर, कोप्रोजेक्ट डायरेक्टर गौरव सुरेका, अमरजितसिंग बग्गा, शशांक कस्तुरे, विरेंद्र शहा, हरप्रितकौर बग्गा, बबलीकौर छाबरा, संकेत नावंदर, सुयोग झंवर, अभिषेक राठी, स्वप्नील महर्षी, कन्हैय्या अग्रवाल, आदित्य डिडवाणीया, श्रेयस कलंत्री, भुषण गरड, आयुष मोदी, कुशल पनपालीया, सुयश टावरी, आशिष गोयनका, करण पनपालीया, बलजित छाबरा व जेसीआय सिटीचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment