डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुलाच्या अभ्यासिका केंद्रास इंटरनेटची मोफत सुविधा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-
स्वर्गीय नीलकंठ दीपचंद इंगळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला इंटरनेट सुविधा मोफत सुरू करून देण्यात आली. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुल अभ्यासिका केंद्राचे प्रमुख संजय गवई, रीना खंडेराव, दाभाडे सारिका हेलोडे यांच्यासह इंगळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Post a Comment