कांचन नगरातील रस्त्यांसाठी नागरिकांनी घेरले अभियंत्याला

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीमधून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून टेंडरही काढण्यात आले आहे. व मक्तेदाराला गेल्या दिड वर्षापासून आदेश देऊन सुद्धा अद्याप प्रत्यक्षात रस्त्याचे काम झाले नाही. मात्र अजूनही काही ठिकाणी मक्तेदार यांनी रस्तेचे खोदकाम व मोठी गिट्टी टाकून ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत त्यासाठी त्या ठिकाणी रस्ते व्हावे यासाठी आज कांचन नगर मधील माजी नगरसेविका सौ. कांचन ताई सोनवणे, अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळी, रतिलाल सपकाळे, प्रकाश सोनवणे अड. किरण सोनवणे, सुकदेव सपकाळे, विनोद सोनवणे, अनिल सोनवणे, सुभाष वास्कर, रवा पाटील, व परिसरातील नागरिक भेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता प्रशांत सोनवणे व निवासी जिल्हाधिकारी भिमराव दराडे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले व त्वरित रस्ता करण्याची मागणी त्यांनी केली. जर रस्ते चे कामे प्रत्यक्ष १५ दिवसाचा आत सुरु नाही झाले तर, परिसरातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसतील असा त्यांनी इशारा दिला.



महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर शंभर कोटीचा निधी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरासाठी मंजूर केला होता. या डीडी मधून जळगाव शहरातील अनेक प्रभागांमधील रस्त्यांची आखणी व मंजुरी करून टेंडरिंग करण्यात आलेले आहे. अशाच प्रभाग क्रमांक 2 अ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले त्या ठिकाणी खोदकाम करून मोठी गिट्टी टाकण्यात आला मात्र गेल्या एक-दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही अशी नागरिकांनी ओरड केली. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली व काम काम होत नाहीये या प्रभागातील रस्ते तयार करण्यात का येत नाहीये याबाबत विचारणा केली.


सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांची समजूत काढत नागरिकांना सांगितले आहे की, त्या रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे. आमच्या वर खूप प्रेशर आहे व ठेकेदारांचे 17 ते 18 कोटी रुपये बिल बाकी आहे. त्यामुळे त्यांना ते बिल मिळणार की नाही मिळणार म्हणून अनेक ठेकेदारांनी कामे बंद केले. प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांना सांगितले कि तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही त्याचा आतच मी आपल्या परिसरातील कॉन्क्रेट रस्त्याचे कामे हि मार्गी लावेल मात्र याबाबत संबंधित ठेकेदाराला व संबधित अभियंताला त्यांनी तत्काळ साईड वर पाठवून समस्सेचे निवारण करून प्रत्यक्ष काम सुरु करण्याचा सूचना दिल्या सदरहू रोडांचे कामे त्वरित मार्गी लावावे म्हणून आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा प्रशांत सोनवणे साहेब यांना दूरध्वनी वरून आदेश केले.अशी माहिती राजेंद्र कोळीअखिल महाराष्ट्र संघटना जिल्हा अध्यक्ष (जळगाव)मो 9764265729 यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post